शिवसेना नगरसेवकांवर गुन्हे नोंदवा

श्रीपाद छिंदम याची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – महापालिका सभागृह हे लोकशाहीचे प्रतिक आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीवेळी त्याचा पावित्र्य शिवसेनेच्या नगरसेवकांनी भंग केले आहे. मतदानाच्या पवित्र कामात अडथळा आणला आहे. सभागृहात घोषणाबाजी करत मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेऊन शिवसेना नगरसेवकांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी नगरसेवक श्रीपाद छिंदम याने केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना यासंदर्भात त्याने निवेदन दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर व उपमहापौरपदासाठी 28 डिसेंबरला मतदान झाले. या निवडणुकीवेळी छिंदम हा मतदानसाठी पोलीस संरक्षण घेऊन आला होता. नियमानुसार सभागृहात अंगरक्षक घेऊन उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे ते सभागृहाबाहेरच थांबले होते. सभागृहात मतदान प्रक्रिया चालू असतांना महापौर पदाकरीता मतदान केल्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी छिंदम याच्यावर हल्ला करत मारहाण केली. सभागृहात अंगरक्षक असते तर आपल्यावर हा जीवघेणा हल्ला झाला नसता. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी श्रीपाद छिंदमने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, महापालिका सभागृहात महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणूक प्रक्रिया चालू असतांना आपल्यावर हल्ला झाल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे पीठासन अधिकारी यांनी महापालिकेचे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. ती कारवाई उचित नसून, त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे. या कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार नाही. सभागृहात मतदान प्रक्रिया बंद पाडली, अशोभनिय वर्तणूक करून सरकारी कामात अडथळा आणला त्यांच्यावर प्रशासनाने प्राधान्याने गुन्हे नोंदवावे, अशी मागणी छिंदम याने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)