शिवसेना जिल्हाप्रमुखपदी जयवंत शेलार

कोयनानगर – सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार असताना सुध्दा शिवसेनेत गटबाजीचा संभ्रम निर्माण करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये खांदापालट झाला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर असणाऱ्या हर्षद कदम यांची उचलबांगडी करून जिल्हाप्रमुख या पदावर शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंतराव शेलार यांची निवड झाली आहे. जयवंतराव शेलार यांच्या निवडीमुळे जिल्हा शिवसेनेवर पाटण तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आ.शंभूराज देसाई यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.

सातारा व सांगली जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी निवड मातोश्री वरून जाहीर करण्यात आली आहे.सातारा जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असेलेले हर्षद कदम यांची उचलबांगडी करून या पदावर कोयना विभागातील शिवसेनेचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते जयवंतराव शेलार यांची निवड केली आहे.शिवसेना वआ.शंभूराज देसाई यांच्यात समन्वय साधून जयवंतराव शेलार हे काम करत असल्याने त्याच्या नावाला शिवसेना आ.शंभूराज देसाई व शिवसेना यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.

जयवंतराव शेलार यांनी शिवसैनिक कोयना विभागप्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा उपप्रमुख असा चढ़ता प्रवास केला आहे .त्याच्या कामाची दखल घेवुन पक्ष नेत्रुत्वाने जिल्हाप्रमुख या पदावर नेमणूक केली आहे. जयवंतराव शेलार यांच्या निवडीमुळे शिवसेनेत उत्साह संचारला आहे. पाटण तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी शिवसेना आ.शंभूराज देसाई यांच्या हस्ते नूतन जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)