शिवसेना काँग्रेससोबत आल्यास त्यांचं स्वागत करू -पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद : भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेना काँग्रेससोबत आल्यास आम्ही शिवसेनेचे स्वागतच कर,मात्र त्यापूर्वी हायकमांडशी चर्चा करावी लागेल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क – वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान आघाडीसंदर्भातले सर्व निर्णय दिल्लीत होतात त्यामुळं दिल्लीतच या बाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. मात्र भाजप शिवसेनेची कोणत्याही परिस्थितीत साथ सोडणार नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून भाजप शिवसेनेला सोबत ठेवतीलच असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलय ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)