शिवसेना उपतालुका प्रमुखपदी शिंगाडे

नायगाव- गुऱ्होळी गावचे वाशी मार्केटचे व्यापारी महादेव शिंगाडे यांची नुकतीच शिवसेना पुरंदर उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी त्यांची नियुक्ती केली. नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते देऊन त्यांचे अभिनंदन केले. शिंगाडे हे गुऱ्होळी गावचे पुरंदर तालुक्‍यातील एक नावाजलेले व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गावागावात शिवसेना पक्षवाढीसाठी काम करणार असून विजय शिवतारे यांच्यामुळे पुरंदरचा कायापालट होत आहे. पुरंदर तालुक्‍याची दुष्काळी तालुका म्हणून असणारी ओळख पुसली जात असल्याचे शिंगाडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, राजूशेठ झेंडे, माजी सरपंच हिरामण खेडेकर, दादासो खेडेकर, बाळासो मचाले, दादा खेडेकर, तुषार खेडेकर, सोपान खेडेकर, दिलीप शिंगाडे, अरुण शिंगाडे, कैलास खेडेकर, मच्छिंद्र भोसले, सोपान शिंगाडे, संदीप शिंगाडे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)