शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिरूरमध्ये अभिवादन

शिरूर- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आणि त्यांचे आचार – विचार नेहमी आमच्या मनामध्ये असून, यामुळे शिवसैनिकांना ऊर्जा आणि काम करण्याचे प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन शिवसेना शिरूर शहरप्रमुख, नगरसेवक संजय देशमुख यांनी व्यक्‍त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला जिल्हा उपसंघटक विजयाताई टेमगिरे, शहर प्रमुख संजय देशमुख, नगरसेविका अंजली थोरात, उपशहरप्रमुख मयूर थोरात, नगरसेवक मंगेश खांडरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल लोंढे, बलराज मल्लाव, खुशाल गाडे, पप्पू गव्हाणे, सुरेश गाडेकर, नितीन जामदार, संतोष पवार, आकाश खांडरे, सुनील जठार, गणेश लोखंडे, सुजित जठार, अमोल गोरे, मेहबूब सय्यद, सुशांत कुटे, सुनील परदेशी, संदीप चव्हाण, शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)