शिवशाही व्यापारी संघाचे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

पिंपरी –शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पिंपरी कॅम्पातील शगून चौक या ठिकाणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने विविध कायक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व संघटनेचे प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पुणे जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे यांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले .

यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, हरेश नखाते, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, माऊली जाधव, दत्ता गिरी, गणेश पाडूळे, निलेश भोरे, सागर शिंदे, दीपक कांबळे, महेश गूळगोंडा, अमित आहेर, दत्ता क्षीरसागर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)