“शिवशाही’ थोडक्‍यात बचावली

पाचगणी – सुरुवातीपासूनच वादात राहिलेल्या “शिवशाही’ बसचा सोमवारी सायंकाळी महाबळेश्‍वर दरम्यान शेरबागनजीकच्या वळणार अपघात होता होता वाचला. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आज प्रवाशांचा जीवा वाचला आहे. महाबळेश्वरवरून पुण्याला जाणारी शिवशाही बस शेरबाग शेजारील वळणावर आज सायंकाळी 4 ते 4.15 च्या दरम्यानया अरुंद वळणावर आली असताना वाईवरून माल वाहतूक करणारा ट्रकने या बसला हूल दिल्याने बस घाटातून खाली गेली असती. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी बाजूला घेतली.

या वळणावर पाण्याचा ट्रॅंकर कायम रस्त्याच्या बाजूला उभा असतो. तसेच रस्त्याच्या बाजूला असणारे होर्डिंग यामुळे खालून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सदर या ठिकाणी असणारा बोर्ड व पाण्यासाठी उभा राहणार टॅंकर हलवण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे सदर घटनेची माहिती पाचगणी पोलिसांना समजताच पाचगणी पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे, किर्तीकुमार कदम मदतीसाठी आले. या गाडीत एकूण 15 ते 20 प्रवाशी प्रवास करत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)