शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी शॉर्टसर्किट

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरामधील वीजमीटर जवळील जुनाट वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन वीजमीटर व वायरिंगला किरकोळ आग लागली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घरी जाऊन पुढील धोका टाळला. ही घटना गुरुवारी (दि. 17) पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील वाड्यामधील वायरिंगमध्ये ठिणग्या उडून किरकोळ आग लागली. यात जुन्या वायर्स व वीजमीटर जळाले. मात्र, एमसीबी ट्रीप झाल्यामुळे घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणला याबाबत माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ शिवशाहीर पुरंदरे यांच्या घरी जाऊन पुढील धोके टाळण्यासाठी पाहणी व उपाययोजना केल्या. यामध्ये वीजमीटर ते वाड्यांतर्गत असलेल्या सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या वायरिंगचे इन्सूलेशन खराब झाल्याचे निदर्शनास आले. एखादी पाल किंवा उंदरामुळे इन्सूलेशन खराब झालेल्या ठिकाणच्या वायरिंगध्ये हे शॉर्टसर्किट झाल्याचे दिसून आले.

पर्वती विभागाचे कार्यकारी अभियंता सायस दराडे यांनीही शिवशाहीर पुरंदरे यांच्या घरी जाऊन वीजमीटर व वायरिंगची पाहणी केली. यावेळी जुनी तसेच इन्सूलेशन खराब झालेली वायरिंग बदलून घेण्याची विनंती महावितरणकडून करण्यात आली. दरम्यान शिवशाहीर पुरंदरे यांच्या घरी नवीन वीजमीटर बसविण्यात आले असून वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)