शिवशाहीच्या धडकेत बैलगाडीतील महिलेचा मृत्यू

 

नागठाणे (प्रतिनिधी)
ग्वाल्हेर-बंगलोर आशयाई महामार्गावर वळसे (ता.सातारा) गावच्या हद्दीत शिवशाही बसने बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडीतील महिलेचा जागीच मृत्यू झाला. नीता भागवत बांगर (वय-30 रा.सावरगाव ता.गेवराई जि. बीड) असे या महिलेचे नाव आहे. आज दुपारी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

-Ads-

घटनेची माहीती मिळताच बोरगाव पोलिसांनी तात्काळ महामार्गावर धाव घेतली. आज दुपारी आडीच वाजण्याच्या सुमारास वळसे गावच्या हद्दीत हॉटेल इंद्रप्रस्थ समोर आजर्‍याहुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने बैलगाडीला जोरदार धडक दिली.

अपघातातील बैलगाडी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेवुन निघाली होती. अपघातात ऊसाने भरलेली बैलगाडी महामार्गावर पलटी झाली. त्यामुळे बैलगाडीत बसलेल्या नीता भागवत बांगर शिवशाही बसच्या चाकाखाली पडल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
28 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)