‘शिवशाही’च्या धडकेत ऊसतोड महिला ठार

नागठाणे, दि. 12 (प्रतिनिधी) – ग्वाल्हेर-बंगलोर आशियाई महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामंडळाच्या शिवशाही बसने पुढे असलेल्या ऊसाने भरलेल्या बैल गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बैलगाडी वरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. नीता भागवत बांगर (वय 30 रा. सावरगाव ता. गेवराई जि. बीड) असे मृत महिलेचे नाव आहे. यामुळे महामार्गावरील वहातूक काही काळ विस्कळीत झाली होती.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास वळसे गावच्या हद्दीत हॉटेल इंद्रप्रस्थ समोर आजर्‍याहुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने अपशिंगेहून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडे चाललेल्या ऊसाने भरलेल्या बैलगाड्यांमधील एका बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ऊसाने भरलेली बैलगाडी महामार्गावर उलटी झाली तर या बैलगाडीत असणार्‍या नीता भागवत बांगर (वय-30 रा. सावरगाव ता. गेवराई जि. बीड) या शिवशाही बसच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)