शिवशाहीच्या एसी स्लीपर दरात कपात

230 ते 505 रूपये केले कमी

मुंबई – राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाहीच्या स्लीपर कोचच्या तिकीट दरांमध्ये मोठी कपात केली आहे. किमान 230 ते 505 रूपयांपर्यंत तिकिटांचे दर कमी केले असून 13 फेब्रुवारीपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाने शिवशाही एसी बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या एसटी महामंडळातर्फे राज्यातील विविध 42 मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खासगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे.

वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये 30 टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)