‘शिवशाही’च्या अपघातांवर प्रशिक्षणाचा उतारा

महामंडळाचा दावा : मध्यवर्ती संस्थेत देण्यात आले प्रशिक्षण

पुणे – शिवशाही चालक, तांत्रिक यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणानंतर गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील शिवशाही अपघातांत घट झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. एप्रिल ते ऑगस्ट-2018 दरम्यान शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण दर एक लाख कि.मी मागे 0.34 टक्के होते. मात्र, केलेल्या उपाययोजनांनतर यात सुधारणा होऊन सप्टेंबर मध्ये 0.28 तर ऑक्‍टोबर मध्ये हेच प्रमाण 0.21 टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याची नोंद राज्य परिवहन प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभलेल्या शिवशाही बसेस वारंवार होणाऱ्या अपघातामुळे टीकेचे लक्ष बनल्या होत्या. यामुळे अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सूचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामंडळाने समिती नियुक्त करून अपघातांच्या कारणांचे विश्‍लेषण करून उपाययोजना करण्यास सुरू केले. पुणे येथील महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत एस.टी महामंडळाच्या चालक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

यानूसार स्वमालकीच्या शिवशाही बसेसबाबत एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान दर एक लाख किलोमीटर मागे 0.41 टक्के अपघाताचे प्रमाण होते. मात्र, दिलेल्या प्रशिक्षणानंतर यात घट होऊन सप्टेंबरमध्ये 0.34 तर ऑक्‍टोबर महिन्यांत 0.18 % पर्यंत प्रमाण खाली आल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या अपघाताचे वार्षिक प्रमाण दर एक लाख कि.मी. मागे 0.18 टक्के इतके अत्यल्प असून यानुसार शिवशाही बसचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

असे दिले प्रशिक्षण
– बसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण.
– चालकांचे विना अपघात बाबत समुपदेशन.
– वाहनांची दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण.
– घाट, रास्ता व वळणावर तज्ञ मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण.

….राज्यातील शिवशाहीची स्थिती
एकूण शिवशाही – 998
राज्यातील शिवशाही मार्ग – 278
दैनंदिन होणाऱ्या फेऱ्या – 2,130


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)