शिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार-रामदास कदम

औरंगाबाद : राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली.

२०१४ मध्ये जनतेला लॉलीपॉप दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र, आता मोदी लाट ओसरली असून, भाजपची उलटगिनती सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आठ आणि सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन अशा एकूण १२ लोकसभा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहात घेतला. पहिल्या दिवशी मराठवाडा पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी नगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर कडवट टीका केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)