शिवशाहीचा प्रवास….नुसताच संताप!

नगर –पुण्याला लवकर पोचण्याच्या उद्देशाने शिवशाहीमध्ये बसलो. नगर-पुणे तिकीट 240 रुपये. प्रवास आरामदायी, लवकर होण्याची अपेक्षा अवघ्या अर्ध्या तासात धुळीला मिळाली. सुप्याजवळ शिवशाही बस फेल झाली. अर्धा तास सगळेच प्रवासी दुसरी बस येण्याची वाट पाहत होते. कुणाचे महत्वाचे काम, तर कुणा तरुणांचा इंटरव्ह्यू…सारेच वैतागलेले… जयंत येलुलकर यांच्यासह अन्य प्रवाशांचा हा अनुभव. प्रवाशांच्या संतापाची एसटी महामंडळ दखल घेऊन ुउपाययोजना करील का, हा प्रश्‍नच आहे.
शिवशाही आरामदायी बस. काही महिन्यांपूर्वी वाजत गाजत या बसचा लोकार्पण सोहळा झाला.
एसटी महामंडळाच्या बस या फक्त काही दिवसांसाठीच दिमाखदार, स्वच्छ असतात. त्यानंतर त्यांची पुरेशी देखभाल, दुरुस्ती केली जात नाही, हा प्रवाशांचा गेल्या 58 वर्षांपासूनचा अनुभव आहे. तो नावालाच शाही असलेल्या शिवशाही बसच्या बाबतीतही येतो आहे. प्रवासी एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करतात. त्याच कारण या बसवर अजूनही लोकांचा विश्वास आहे. प्रवासी ज्या वेळी दोन पैसे जास्त मोजून शिवशाहीमध्ये बसतात. त्या वेळी त्यांची आरामदायी, सुरक्षित; तरीही वेगवान प्रवासाची अपेक्षा असते. सध्या स्पर्धेचे युग आहे. खासगी कंपन्यांची मोठी स्पर्धा असताना एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी या गोष्टीचे भान ठेवून प्रवाशांना योग्य सेवा द्यायला हवी. तशी ती दिली, तर तोट्यात असलेली एसटी नफ्यात यायला वेळ लागणार नाही.
जादा पैसे मोजूनही शिवशाहीला अस्वच्छ मळलेले पडदे असतात. बसच्या खिडक्‍यांच्या काचा महिनो न महिने या पुसल्यात की नाही, असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती झाली आहे.
शिवशाही हे नाव छत्रपती शिवरायांच्या राजवटीशी संबंधित आहे. त्यांच्या प्रशासन व्यवस्थेचा आदर्श घेतल्याचा राज्य सरकार गवगवा करीत असले, तरी शिवशाहीचा अनुभव लक्षात घेतला, तर इथे शिवशाही नाही, तर प्रवाशांवर जुमलेशाही केल्याचा अनुभव येत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. मागच्याच आठवड्यात संगमनेरजवळ शिवशाहीचे टायर फुटून अपघात होता होता वाचला होता.
एसटी महामंडळाने शिवनेरी आणि शिवशाही या बसचे नाव बदलून किमान शिवाजी महाराजांशी निगडीत बाबींचा अवमान होणार नाही, एवढे तरी पाहावे, अशी मागणी येलुलकर यांनी केली आहे.

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)