शिवशंभो गणेशोत्सव मंडळाने केले मुलींच्या नावे डिपॉजिट

लाखणगाव- काठापुर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शिवशंभो नवतरुण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मागील वर्षभरात जन्मलेल्या गावातील मुलींच्या नावे मंचर येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत प्रत्येकी 5 हजार रुपये डिपॉजिट करण्यात आले आहेत. त्याची ठेवपावती संबधित मातापित्यांना प्रदान करण्यात आली.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, माजी उपसभापती अशोक करंडे, वसंत घुले, सोपान थोरात, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर गायकवाड उपसरपंच कान्हु करंडे, मंडळाचे अध्यक्ष गुलाब करंडे समवेत ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचारी सागर गायकवाड म्हणाले की, गणेशोत्सव मंडळानी समाजाला प्रेरणा देणारे देखावे सादर करावेत. अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन विधायक कामांना प्रोत्साहन दिल्यास सामाजिक बांधिलकी जपली जाते. पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)