शिवशंकर बजारचे श्रीपूर येथे स्थलांतर

अकलूज- शिवशंकर बझारने जनतेच्या हितासाठी, फायद्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, त्याचा लाभ घेऊन जनतेने आपली उन्नती साधावी, असे उद्‌गार खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी काढले. श्रीपूर (ता. माळशिरस) येथे शिवशंकर बजार सहकारी संस्थेच्या शाखा श्रीपूरचे नूतन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले असून, याचा उद्‌घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाला.
या वेळेस माळशिरस तालुका पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, आकलुज ग्रामपंचायत सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवशंकर बजारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन डॉ. प्रकाश पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन रामचंद्र सावंत पाटील, माजी संचालक नानासाहेब मुंडफणे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक रेडे, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील, सुरेश गुंड पाटील, हरिभाऊ जाधव, अमोल पाटील, राजकुमार पाटील, प्रफुल्ल नष्टे, हरिभाऊ जाधव, राजेंद्र भोसले, बबनराव खटके, कासिम मुलाणी, लक्ष्मण रेडे, मनोज पिसाळ आणि इतर मान्यवर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवशंकर बजारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील, व्हॉईस चेअरमन अर्जुनराव भगत, सरव्यवस्थापक संभाजीराव पाटील, संचालक विजय जोशी, नारायण फुले, सिनाप्पा वाघमोडे, बलभीम किर्दकर, कैलास ताटे, ज्येष्ठ संचालक धुमाळ, मदन भगत, सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन विलासराव दोलतडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)