शिवशंकराच्या जयघोषाने दुमदुमला माहेश्‍वरी चौक

सांगवी – श्रावणी सोमवारानिमित्त माहेश्वरी चौकात शंकराच्या मुर्तीसमक्ष दत्तात्रय भोसले व छाया भोसले यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. यावेळी भाविकांना 300 किलो शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. दापोडी, पिंपळेगुरव, जुनी सांगवी , नवी सांगवी येथील महिला भजनी मंडळांनी सुमधुर भजन सादर केले. यावेळी मारूती जाधव, संतोष ढोरे, सुनिल महतो, गणेश जगताप,, शाम ढमाले, विश्वास मोरे, बाळासाहेब सोनवणे, योगेश शितोळे आदी उपस्थित होते. सांगवी येथील मधुबन महिला मंडळाने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. नगरसेविका माई ढोरे, दत्तात्रय भोसले व रविंद्र बाईत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कै.हभप शांताराम बाईत यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात आला. यावेळी गायनाचार्य सुनीता बोत्रे, मुदूंगचार्य साधना थोरात यांना विशेष पारितोषिक देण्यात आले. यावेळी मंडळाच्या अंजना तनपुरे, मंगल झावरे, दमयंती जगताप, उमा चिटणीस, संगीता ढोरे, चंद्रकला गायकवाड, वैजयंती कासरूम, आशा जगताप, अलका निगुडकर,लता फिरके, उज्वला पाटिल, शोभा नाईक उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)