शिवलिंग शिखरेला आदर्श कुस्ती संघटक पुरस्कार

खटाव – जांब (ता.खटाव) येथील युवक शिवलिंग शिखरे याचा आटपाडी येथे पैलवान कुस्ती प्रेमी महाराष्ट्र ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात खा. संजयकाका पाटील, अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अंजली या मान्यवरांच्या हस्ते आदर्श कुस्ती संघटक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

गावोगावच्या तरुणांनी कुस्ती क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळावे या करिता कुस्ती खेळाचा निरपेक्ष भावनेने करत असलेल्या प्रसार व प्रचारासाठी शिवलिंगची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सातारा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत, करत एक दिवस प्रसिद्ध कुस्ती निवेदक पै. शंकर अण्णा पुजारी यांच्या सहवासात योगायोगाने आला आणि या क्षेत्राबद्दल त्याला आवड निर्माण झाली. आज तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नवोदित मल्लांना कुस्तीविषयी प्रेरणा देऊन हा खेळ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम शिवलिंग करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी महाराष्ट्र राज्य पैलवान ग्रुपचे अध्यक्ष मारुती जाधव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व माजी आमदार दिनकर पाटील, पै. वीर बंडा पाटील रेठरेकर, कुस्ती मल्लविद्या चे संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे, पैलवान नामदेव बडरे, महाराष्ट्र चॅम्पियन अनिल बोरकर, प्रा. राजेंद्र जगदाळे व राज्यातील अनेक मल्ल उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)