शिवरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात

खळद- शिवरी (ता. पुरंदर) येथे रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. तसेच शिवरी, वाळुंज गावातून चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी म्हाडाचे माजी उपाध्यक्ष संभाजी झेंडे, संस्थेचे सल्लागार सदस्य शंकर कामथे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, सारिका इंगळे, सुहासिनी बिवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शहाजी कोळेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अनुराधा जगताप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)