शिवरी परिसरात रानडुकरांचा हैदोस

खळद- शिवरी (ता. पुरंदर) परिसरात डोंगरालगत असणाऱ्या वस्तीवर रानडुकरांनी हैदोस माजविला असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
डोंगराच्या लगत असणाऱ्या लिंभोरे वस्ती, ईनामवस्ती, तुकाईदरा, शिवरखिंड, शंभूचा मळा, पीराचीवस्ती परिसरातील शेतकऱ्यांनी भुईमूग, वाटाणा, डाळींब, मका ही पिके घेतली आहेत. परंतु, रानडुकरांनी याचे प्रचंड नुकसान केले आहे. अनेक उभ्या पिकांची नासधुस केली आहे. रात्री नऊ नंतर रानडुकरांचा शेतात वावर असतो. त्यामुळे अनेक शेतकरी गस्त घालीत आहेत. परंतु, रानडुकरे कळपाने येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिकार कमी पडत आहे.
पिकाच्या संरक्षणासाठी शेतकरी झाळी लावणे, तारा लावणे, फटाके लावणे आदी उपाय करीत आहेत. पण याचा फारसा उपयोग होत नाही. याबाबत काही शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
याबाबत परींचे विभागाचे वनपाल महादेव सस्ते यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी नुकसानग्रस्त पिकांचा शेतकऱ्यासह फोटो, सातबारा उतारा, बॅंक पासबुक, तलाठी दाखला, रहिवासी दाखला, आधारकार्ड आदी कागदपत्रे सादर करावीत. त्यानंतर संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)