शिवरायांना अभिवादन करुन मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ

नगर: मराठा क्रांती मोर्चा आंदोलन मोडून काढण्यासाठी सत्ताधारी व काही राजकारणी भाडोत्री प्यादे पुढे करत आहेत. समाजातील संभ्रम दूर करणे, जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करीत निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारी करण्याच्या उद्देशाने विभागनिहाय “मराठा संवाद यात्रा’ दि. 16 ते 26 नोव्हेंबर दरम्यान राज्यभर आयोजित केली जाणार आहे.

नाशिक महसूल विभागीय यात्रेचा शुभारंभ नगरपासून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या विभागीय बैठकीत घेण्यात आला होता. यास अनुसरून नगर शहरात सावेडीतील गुरुदत्त लॉन्स येथे दि. 13 नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाची बैठक झाली. मराठा क्रांती मोर्चाचे प्रत्येक तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोपर्डी (ता.कर्जत) येथे अल्पवयीन विद्यार्थीनीवर दि.13 जुलै 2016 रोजी अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर सकल मराठा समाजाने एकजुटीने मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आयोजन केले. ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबणे, मराठा समाजाला आरक्षण देणे आदी 20 मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले होते.

फसव्या घोषणा, शब्दच्छल, समाजातील, केवळ गाजावाजा, घोषणाबाजी यास समाजाने बळी पडू नये, यासाठी समाजातील संभ्रम दूर करणे, जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करीत निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारी करण्याच्या उद्देशाने “मराठा संवाद यात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय राज्य समन्वय समिती व कोअर कमिटीने जाहीर केला आहे.

नगर शहरात दि.16 रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नाशिक विभागीय संवाद यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे. पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडामार्गे पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्‍वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे येवला येथे यात्रा जाणार आहे. येवला येथून नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत. दि.26 नोव्हेंबर रोजी विधानमंडळावर ही यात्रा धडकणार आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाला म्हणजे आरक्षण मिळाले असे नव्हे तोपर्यंत समाजाला आरक्षणाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, मराठा आरक्षणाला कायदेशीर अडथळे येणार नाहीत. याची सरकारने किती काळजी घेतली आहे. याची खातरजमा होत नाही. तोपर्यंत आरक्षण मिळाले असे म्हणता येणार नाही.आरक्षणाबरोबरच मराठा क्रांती मोर्चाद्वारे ज्या 20 मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत. त्याही महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आरक्षणासह सर्व 20 मागण्यांना न्याय मिळाल्याशिवाय हटायचे नाही. या निर्धाराने मराठा संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संजीव भोर पाटील, विजय म्हस्के, नवनाथ वायाळ, राम झिने, प्रमोद भासार, मयूर वांढेकर, राजेंद्र कर्डिले, विशाल म्हस्के, संदीप सायंबर, संदीप वाघ, गोरख आढाव, शुभम माने, प्रमोद घोरपडे, संदीप संसारे, सुरेखा सांगळे, मच्छिंद्रनाथ म्हस्के, राजाभाऊ वराट, अण्णा काळे, नितीन ढाळे आदीं मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)