शिवरायांच्या कवड्यांच्या माळेची पालखीतून मिरवणूक

इंदापूर महाविद्यालयात स्वराज्यप्रेरिका जिजाऊ जयंती साजरी

रेडा- शिवभक्त परिवार आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती इंदापूर महाविद्यालयातील प्रांगणात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या गळ्यातील समुद्र कवड्यांच्या माळेची पालखीतून मिरवणूक काढून तिचे पूजन करण्यात आले.
यावेळी 1962च्या चीन बरोबरच्या युद्धातील इंदापूर तालुक्‍यातील पहिले अमर शहीद जवान नामदेव कदम भाटनिमगाव यांच्या धर्मपत्नी, वीरपत्नी श्रीमती रंजनाताई नामदेव कदम यांना यावर्षीचा जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजी माजी सैनिक व सीआरपीएफ आणि एसआरपीएफ यांच्या माता आणि पत्नी यांचाही सन्मान करण्यात आला. डॉ. शितल मालसुरे म्हणाल्या की, समाज परिवर्तनाचे चांगले कार्य या इंदापूरच्या भूमीतून होत आहे. स्वराज्य रक्षणासाठी सर्व माता भगिनी एकत्र आल्या पाहिजे तसेच अन्यायाला प्रतिकार करायला शिकले पाहिजे.
गजानन शिंदे म्हणाले की, युवा शक्तीला प्रेरणा देण्याचे कार्य जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी केले. युवा शक्तींनी शिवचरित्राचा वसा घेऊन आपले कार्य पुढे न्यावे. यावेळी फायटर पायलट सुजय यादव, पै. सागर मारकड, तेजस्वी व्यवहारे, काजल जाधव, रोहित शिंदे, अनस पठाण, ना.रा. हायस्कूल येथील बेसबॉल टीम, रोहन ढोले, शिवांजली रणवरे, साक्षी कांबळे तसेच डॉ. भरत भुजबळ आणि टीम, गलांडवाडी येथील लेझीम पथक, जावीर सर आणि टीम यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, मंगेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, नगरसेवक कैलास कदम, दीपक जाधव, महेंद्र रेडके आदी उपस्थित होते.
शिवभक्त परिवाराचे संस्थापक डॉ. लक्ष्मण आसबे यांनी शिवभक्त परिवार करीत असलेल्या कार्याची माहिती मनोगतातून दिली. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब पराडे आणि रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. बापू जामदार यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)