शिवराज सिंह चौहान यांच्या मनात नेमकं चाललंय काय ?

File photo

भोपाळ: कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता…’ असे ट्विट करत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी १९८४ मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला.

भारतात १९८४ मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे नेते यांचे समोर आल्यामुळे भाजपकडून कमलनाथ यांच्या मुख्यमंत्री पडला भाजप कडून विरोध होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी म्हणून शपथ घेतली. याचबरोबर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करत त्यांनी कमलनाथ यांना शुभेच्छा दिल्या.

शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला नंतर शुभेच्छा देखील दिल्या त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या मनात नेमकं चाललंय काय ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)