शिवराज, वसुंधरा आणि रमण आता राष्ट्रीय राजकारणात 

भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली – शिवराजसिंह चौहान (मध्यप्रदेश), वसुंधरा राजे (राजस्थान) आणि रमण सिंह (छत्तिसगढ) यांची गुरूवारी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भाजपने त्या तिन्ही नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात आणल्याचे मानले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची दिशा निश्‍चित करण्यासाठी भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद बैठकीला उद्यापासून (शुक्रवार) प्रारंभ होणार आहे. त्या महत्वपूर्ण बैठकीच्या पूर्वसंध्येला पक्षाने शिवराज, वसुंधरा आणि रमण यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यामुळे त्या तिघांवर पक्ष आणखी मोठी भूमिका सोपवण्यास सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला मध्यप्रदेश, छत्तिसगढ आणि राजस्थान या राज्यांच्या सत्तेवरून दूर केले. त्या तिन्ही राज्यांत मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले होते. कॉंग्रेसची मुसंडी पाहता पुन्हा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे मोठेच आव्हान भाजपपुढे आहे. त्यामुळे त्या राज्यांतील प्रभावी नेत्यांना आणखी बळ देण्याचे पाऊल भाजपने उचलले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर करून घेण्याचा भाजपचा राजकीय इरादाही स्पष्ट झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)