शिवराजसिंह चौहान यांचेही कॉंग्रेस मध्ये स्वागत करू – कमलनाथ

भोपाळ – भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौड यांनी कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी त्यांच्या मतदार संघात केलेल्या विकास कामांबद्दल त्यांच्या विषयी गौरवोदगार काढले होते. त्यावरून आपण त्यांना कॉंग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे काय असा प्रश्‍न आज पत्रकारांनी कमलनाथ यांना विचारला असता, त्याला उत्तर देताना कमलनाथ म्हणाले की एकटे गौड काय शिवराजसिंह चौहान हे सुद्धा जरी कॉंग्रेस मध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.

ते म्हणाले की काल गौड जे म्हणाले आहेत ते वास्तव आहे. मी केंद्रात नगरविकास खात्याचा मंत्री असताना मध्यप्रदेशसाठी सर्वाधिक निधी मी मिळवून दिला होता. मी त्या काळात एकटया मध्यप्रदेशला 4500 कोटी रूपयांचा निधी दिला होता असे त्यांनी म्हटले आहे. आपण स्वत: यंदाची विधानसभेची निवडणूक लढवणार काय असे विचारता ते म्हणाले की मी अजून त्याविषयी काहीं ठरवलेले नाही कारण मी अजून लोकसभेचा सदस्य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)