शिवराजसिंह चौहान यांचा केंद्रात जाण्यास नकार

भोपाळ – विधानभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना केंद्र सरकारमध्ये समाविष्ट केले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आपण केंद्रात जाणार नाही, आपण मध्य प्रदेशातच राहणार आणि इथंच मरणार, असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे या चर्चांना ब्रेक बसला आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, मध्य प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह या दोघांना केंद्रात बोलवण्यात येणार असल्याची भाजपामध्ये चर्चा होती. मात्र, शिवराजसिंह यांनी आपण मध्य प्रदेशातच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, शिवराज सिंह चौहान आणि रमणसिंह हे यापूर्वी खासदार म्हणून निवडून आले आहेत. रमणसिंह यांनी तर केंद्रात मंत्रीपदही भुषवले आहे. या दोघांना केंद्र सरकारमध्ये कामाचा अनुभव असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी त्यांना केंद्रात बोलावले जाईल, असे बोलले जात होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)