शिवनेर पतसंस्थेला शासनाचा पुरस्कार

पिंपरी – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला.

सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष कैलास आवटे पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, संचालक मुकुंद आवटे, सुहास गटकळ, निंबा डोळस, अरुण टेमकर, ज्योती हांडे, संगीता इंगळे, शांतीश्‍वर पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण हाडवळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मुंबईतील रंगशारदा नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुन्नर तालुका मित्र मंडळाकडूनही भोसरी येथे झालेल्या कार्यक्रमात शिवनेर पतसंस्थेला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांच्या हस्ते गौरवण्यात आले. आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, अतुल बेनके, मेघराज राजे भोसले, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)