शिवनेर पतसंस्थेला “बॅंको पुरस्कार’ जाहीर

भोसरी – अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्‍सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “बॅंको पुरस्कार’ यंदा भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला देण्यात येणार आहे.

याबाबतचे पत्र अविज पब्लिकेशनच्या बॅंकोचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे-गुंडाळे व गॅलेक्‍सी इनमाचे संचालक अशोक नाईक यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे यांना दिले. सोमवार (दि. 26) ते बुधवार (दि. 28) दरम्यान लोणावळा येथे होत असलेल्या ऍडव्हान्टेज 2018 या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन व पुणे येथील गॅलेक्‍सी इनमा यांच्या वतीने महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने बॅंको पुरस्कार प्रदान करण्यात येतात. नागरी पतसंस्था ठेवी रुपये 10 कोटी ते 15 कोटी या विभागातील यावर्षीचा बॅंको पतसंस्था पुरस्कार शिवनेर पतसंस्थेला देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बॅंको पतसंस्था पुरस्कार विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)