शिवनेरी लायन्स्‌, कलाटे वॉरीयर्स संघांचा अंतिम फेरीत प्रवेश 

लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धा 

पुणे, दि. 18 – शिवनेरी लायन्स्‌ आणि कलाटे वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे सुरु असलेल्या लायन्स्‌ क्‍लब डिस्ट्रीक 323 डी-2 तर्फे आयोजित “लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. नेहरू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शिवनेरी लायन्स्‌ संघाने नायर इगल्स संघाचा 16 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर कलाटे वॉरियर्स संघाने ढोमसे टायगर्स संघाचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

-Ads-

यावेळी झालेल्या शिवनेरी विरुद्ध नायर इगल्स सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना शिवनेरी लायन्स्‌ संघाने 20 षटकांत 2 गडी गमावून 236 धावा कुटल्या. यामध्ये योगेश भोंगळे (92) आणि दर्शित मोदी (58) धडाकेबाज फलंदाजी करताना पहिल्या गड्यासाठी 81 चेंडूत 141 धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. नायर इगल्स संघानेही सामन्यात कडवी झुंझ दिली. धीरज कदम याने 53 चेंडूत 101 धावा केल्या. विशाल बारणे याने 71 धावा केल्या. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 58 चेंडूत 120 धावांची भागिदारी केली. नायर इगल्सचा डाव 20 षटकांत 5 गडी बाद 220 धावांवर आटोपला. कलाटे वॉरीयर्स ढोमसे टायगर्सचा 8 गडी राखून सहज पराभव करत अंतिम फेरी गाठली. 43 धावा करणारे वसंत कोकणे सामन्याचा मानकरी ठरले.

तर दुसर्या सामन्यात ढोमसे टायगर्स संघाने 20 षटकांत 8 बाद 88 धावांची मजल मारत कलाटे वॉरियर्सच्या संघासमोर विजयासाठी 89 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना कलाटे वॉरियर्स संग़्हाने हे आव्हान 11.5 षटकांत केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा करत पूर्ण करत सामन्यात विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक 

1) शिवनेरी लायन्सः 20 षटकांत 2 बाद 236 (योगेश भोंगळे 92, दर्शित मोदी 58, साजन मोदी 37, संतोष पाटोळे 29) वि.वि. नायर इगल्स ः 20 षटकांत 5 बाद 220 (धीरज कदम 101, विशाल बारणे 71, सचिन जयवंत 2-30); सामनावीरः योगेश भोंगळे.
2) ढोमसे टायगर्सः 20 षटकांत 8 बाद 88 (शेखर दालमिया 20, देविदास ताटे 18, कुणाल शिंदे 3-18, सौभर रवालिया 2-18) पराभूत वि. कलाटे वॉरीयर्सः 11. 5 षटकांत 2 गडी बाद 91 (सौभर रवालिया 33, वसंत कोकणे 43); सामनावीरः वसंत कोकणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)