‘शिवनेरी’ बसेसच्या तपासणीसाठी आता एक महिन्याची डेडलाईन

पुणे- आरामदायी आणि प्रवासासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या “शिवनेरी’ बसेसच्या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार राज्यभरातील सर्व बसेसची पुन्हा नव्याने तपासणी करण्याचे आणि त्रुटी दूर करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाने सर्व विभागांना दिले आहेत. ही तपासणी पूर्ण करण्यासाठी एका महिन्याची डेडलाईन देण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात खडकी येथे चालत्या शिवनेरीची डिक्‍की उघडून दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर एक जण जखमी झाला होता. या पार्श्‍वभूमीवर व्हॉल्वो कंपनीने तयार केलेल्या शिवनेरी गाडीमध्ये या प्रकारच्या अडचणी कशा निर्माण होतात, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यानंतर गाडीमध्ये काही तांत्रीक समस्या निर्माण झाल्या आहेत का, याची तपासणी करण्यात आली. त्यासाठी आठ दिवसांची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, ही तपासणी अधिक पारदर्शी व्हावी यासाठी हा कालावधी वाढवून देण्यात आला होता. तरीही या पथकाने नियोजित वेळेतच ही तपासणी पूर्ण केली. त्यानंतर तयार करण्यात आलेला हा अहवाल मुख्य कार्यालयाला पाठविण्यात आला होता.

या अहवालावर चर्चा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञांची एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून या अहवालावर चर्चा केली. त्यानुसार काही तांत्रिक बिघाडामुळे डिक्‍कीचा हा दरवाजा उघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याशिवाय अन्य बाबींचाही बारकाईने तपास करण्यात आला, त्यानुसार बसेसमधील या त्रुटी दूर करून नव्याने तपासणी करण्याचे आणि त्या त्रुटी दूर करण्याचे आदेश महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने सर्व विभागांना दिले आहेत. ही तपासणी आणि त्रुटी दूर करण्यासाठी एक महिन्यांची डेडलाईन देण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

… तर अन्य बसेसचीही तपासणी होणार
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सद्यस्थितीत शिवनेरी, शिवशाही आणि अन्य आरामदायी बसेस आहेत. या बसेस प्रवासासाठी सुखकर असल्याने त्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत; त्यातूनच महामंडळाचा महसूलही वाढत आहे. त्यामुळे या बसेसमधील त्रुटी आणि प्रवाशांची नाराजी महामंडळाला परवडणारी नाही, ही बाब लक्षात घेऊन गरज पडल्यास शिवनेरीसह अन्य बसेसचीही तपासणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)