शिवनेरीच्या पायथ्याशी उभारणार पुरातन वस्तू संग्रहालय

नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

जुन्नर -सातवाहन राजवटीतील राजधानी असलेल्या जुन्नर शहराजवळील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी पुरातन वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली.
याबाबत डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. वसंत शिंदे यांनी पालिकेकडे जागेबाबत मागणी केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत शहरालगत असलेल्या शिवसृष्टीजवळील पालिकेची इमारतीत सदर संग्रहालयासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याठिकाणी संग्रहालय, ऐतिहासिक शिवनेरीबाबत माहिती तसेच तालुक्‍यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. या वास्तूची उभारणी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली होणार असून यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. सर्वसाधारण सभेत शिवजयंती उत्सवाचे नियोजन, ज्येष्ठांसाठी उद्यान, अपंग कल्याणकारी निधीचे वाटप, जेटिंग मशीन खरेदी, वीजव्यवस्था, विविध भागांतील रस्त्यांची व गटारीची कामे आदी विषयांवर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, गटनेते दीपेश परदेशी, नगरसेवक दिनेश दुबे, लक्ष्मीकांत कुंभार, जमीर कागदी, समीर भगत, अक्षय मांडवे, फिरोज पठाण, अंकिता गोसावी, अश्विनी गवळी, सुवर्णा बनकर, सना मन्सुरी, समीना शेख, मोनाली म्हस्के, अब्दुल माजीद सय्यद, वैभव मलठणकर आदी उपस्थित होते.

  • पुरातत्त्व खोत्याकडे पाठपुरावा
    किल्ले शिवनेरीवरील अंबरखाना या पुरातन वास्तूमध्ये सातवाहन कालीन वस्तू आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्रहालय साकारणार असून याकरिता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे येथील डेक्कन कॉलेज व जुन्नर येथील सह्याद्री गिरीभ्रमण संस्था गेल्या काही वर्षांपासून पुरातत्व विभाग व शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)