शिवतारेंनी केली शिंदे कुटूंबाला एक लाख रूपयांची मदत

वाल्हे- पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी गावचे दत्तात्रय शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांची जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट घेउन सात्वना केली. यावेळी शिवतारे यांनी शिंदे परिवाराला एक लाख रूपयांची मदत केली आहे.
शिंदे परिवाराची भेट घेण्यासाठी शिवतारे रविवारी पिंगोरी पोहचले. त्यांनी शिंदे यांच्या आई, भाऊ व पत्नी यांची भेट घेतली. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी पवार, पिंगोरी गावचे माजी सरपंच वसंत शिंदे, धनंजय शिंदे, प्रकाश शिंदे उपस्थित होते. मराठा आरक्षण आंदोलनात शिंदे परिवार सहभागी झाले होते. मराठा समाजाला नोकरी मिळत नसल्याची भावना दत्तात्रय शिंदे यांच्या मनात होती. घरातून ते आदल्या दिवशी गाडीवर जातो असे सांगून बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)