शिवतक्रार म्हाळुंगी, पारोडी येथे बेसुमार अवैध वाळूउपसा

पंचनामे केले असून कारवाई करणार
शिवतक्रार म्हाळुंगी आणि पारोडी (ता. शिरूर) येथे रात्रीच्या सुमारास होत असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपसाबाबत शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता याची माहिती मिळाली असून त्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे. तसेच तेथील पंचनामे करून दंडाची नोटीस बजावलेली आहे. तसेच त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात छापे टाकून कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी सांगितले.

शिक्रापूर – शिवतक्रार म्हाळुंगी, पारोडी येथे असलेल्या भीमा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात बेसुमार प्रमाणात अवैध वाळूउपसा होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाळूमाफियांना चांगलेच पेव फुटले आहे. त्यामुळे अशा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे जवळून भीमा नदी वाहत असून येथे वाळू व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वाळूउपसा करत आहेत. त्यामुळे नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. येथे दिवसेंदिवस वाळू काढण्याचे प्रमाण वाढले जात आहे. येथील एका पंचायत समिती सदस्यावर वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झालेला प्रकार नुकताच घडलेला असताना देखील येथे मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जात आहे. वाळू व्यावसायिक दररोज वाळू काढण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवीत आहेत. येथील नदीमध्ये रात्रीच्या सुमारास जेसीबी, पोकलेन, डंपर, ट्रॅक्‍टर तसेच बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा केला जात आहे. नदीमधून उपसा केलेली वाळू येथीलच काही ठिकाणी साठवून ठेवण्याचे प्रकार देखील चांगलेच वाढलेले आहेत. तर येथे होत असलेल्या बेसुमार वाळू उपशामुळे नदीमध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपाचे खड्डे तयार झालेले आहे. येथील खड्ड्यांमध्ये अपघात होण्याची शक्‍यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे येथील वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)