शिवतक्रार म्हाळुंगीत महिलेचा विनयभंग

संग्रहित छायाचित्र

शिक्रापूर/तळेगाव ढमढेरे – शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे (ता. शिरूर) येथे 13 एप्रिल रोजी सकाळी शेतामध्ये काम करणाऱ्या महिलेला झाड तोडल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार पीडित महिला ही तिच्या शेतामध्ये काम करत असताना पोपट शिवले हा तेथे आला. महिलेला झाड का तोडले? असे म्हणत खोऱ्याच्या दांडक्‍याने पाठीत मारून मारहाण केली. तसेच पीडित महिलेला खाली पाडून तिला मारहाण केली. तसेच महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेच्या मुलाला देखील मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी पोपट शंकर शिवले (रा. शिवतक्रार म्हाळुंगी, शिवलेवस्ती, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)