शिवणयंत्रासाठी 2330 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य

पिंपरी – महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मोफत शिलाईयंत्र वाटप योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिलाई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. 2330 लाभार्थ्यांसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद महापालिकेतर्फे करण्यात आली असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत महिला, युवतींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन 2018-19 या आर्थिक वर्षांसाठी एकूण 53 उप योजना असून त्यासाठी महापालिका अंदाजपत्रकात 33 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातीलच एक अटल बिहारी वाजपेयी मोफत शिवणयंत्र वाटप योजना आहे. त्याअंतर्गत महापालिका क्षेत्रातील पात्र महिलांना शिवणयंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. सन 2017-18 या आर्थिक वर्षात एकूण 12 हजार 737 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 9015 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी शिवणयंत्र खरेदी केलेल्या 1666 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी सहा हजार रुपये प्रमाणे 99 लाख 96 हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली आहे.

सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एक कोटी रुपयांची तरतूद महापालिकेतर्फे करण्यात आली होती. त्यातून ही रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यानंतर शिवणयंत्र खरेदी केलेली जीएसटी पावती सादर केलेल्या 2330 पात्र लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत अर्थसहाय्य देणे आवश्‍यक असून त्यासाठी 1 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद करणे गरजेचे आहे. त्याची तरतूद महापालिकेतर्फे करण्यात आली असून त्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

दरम्यान, श्रीमन्‌ मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा चिंचवडगावात रंगतो. या सोळ्यानिमित्त सुमारे दहा लाखाहून अधिक भाविक मंदिर आणि परिसरात येत असतात. या सोहळ्या आवश्‍यक मंडप, लाईट, स्पिकर, बॅरीकेट्‌स आदी सुविधा आणि त्याअनुषंगाने आवश्‍यक व्यवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी देखील येणाऱ्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

परदेशी उच्च शिक्षणासाठी 40 अर्ज प्राप्त
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन परदेशातील उच्च शिक्षणासाठी व प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य ही योजना युवतींसाठी राबविण्यात येते. या योजनेसाठी पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून आजअखेर साडेचार लाख रुपये इतकी रक्कम शिल्लक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षांत आजपर्यंत 40 युवतींनी अर्ज केले आहेत. यातील लाभार्थी युवतींना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य महापालिका करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)