शिवजयंतीदिनी पारनेर तालुका दूध संघाकडून पशुखाद्य, औषधे विक्री सुरू 

दीड महिन्यात सुप्यात दूध संकलन : दादासाहेब पठारे
सुपा – पारनेर तालुका दूध संघाने दूध स्वीकृतीबरोबर व्यवसाय वाढीसाठी अनेक उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पशुखाद्य विक्रीची सुरुवात ज्येष्ठ दूध उत्पादक राजाराम प्रभूजी बागल यांच्या हस्ते करण्यात आली. सुपा येथे हे विक्री केंद्र सुरू करण्यात आले. दूध उत्पादकांना “ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उच्च दर्जाचे पशुखाद्य संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. त्यामुळे पशुखाद्य आहार खरेदीसाठी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होईल. जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढणार आहे. येत्या दीड महिन्यात सुप्यात संघामार्फत दूध संकलन सुरू करणार असल्याचे दादासाहेब पठारे यांनी सांगितले.
यावेळी दूध संघाचे अध्यक्ष दादासाहेब पठारे अण्णा हजारे युवा मंच चे अध्यक्ष व संघाचे संचालक राहुल शिंदे, दादासाहेब वारे, संतोष गांगड, विनायक पवार, अविनाश खंदारे व सर्व संचालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझी स्वतःची जागा संघाच्या विक्री केंद्रासाठी मोफत दिली आहे. संघाचे कर्मचारी या ठिकाणी विक्रीसाठी असणार आहेत. सध्या कुणी शेतकरी विक्री केंद्रावर आला तर त्याला होलसेल दरामध्ये पशुखाद्य व औषधे देणार आहे. येणाऱ्या एक दीड महिन्यांमध्ये सुप्यातील संघ दुरुस्त करून तिथे संकलन सुरू करण्यात येईल, अपे पठारे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)