शिवछत्रपती विद्यालयाच्यावतीने प्रश्‍न मंजुषा स्पर्धा

कडेगाव - विजेत्यांचा गौरव करताना मुख्याध्यापक व अधिकारी व समतादूत.

कडेगाव, दि. 4 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व सहाय्यक आयुक्त कार्यालय सांगली यांच्यावतीने शिवछत्रपती विद्यालय शिवाजीनगर येथे प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.
यात प्रथम क्रमांक सुशांत फुले, द्वितीय क्रमांक श्रावणी नांगरे व तृतीय क्रमांक रोशनी नांगरे यांनी मिळविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देवुन गौरविण्यात आले. संविधान सर्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून बार्टीच्यावतीने विविध स्पर्धाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे, असे प्रकल्प अधिकारी गणेश सव्वाखंडे यांनी सांगितले. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे म्हणून सत्य बोलले पाहिजे आणि सत्यासाठीच अभिव्यक्त झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन समतादुत लता सुरवसे कडेगाव यांनी केले. सूत्रसंचालन समतादुत शहाजी पाटील, स्पर्धेचे विश्‍लेषण सागर आढाव, संविधान वाचन रविंद्र माळी आणि आबा भोसले यांनी केले. ए. एस. मांडके यांनी आभार मानले. सर्व शिक्षक व समतादुत विक्रांत शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समतादुत प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे,सांगलीचे आयुक्त कवले, विभागीय प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड, सांगली प्रकल्प अधिकारी गणेश सव्वाखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)