शिवछत्रपती ग्रुप संभाजी ब्रिगेडचा सन्मान

भवानीनगर- वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने शिवछत्रपती ग्रुप संभाजी ब्रिगेडचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. शिवछत्रपती ग्रुप संभाजी ब्रिगेड, भवानीनगर शिवजन्मोत्सव सोहळा गेली 10 वर्षांपासून पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने सोहळा साजरा करीत आहे. सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांचा जिवंत देखावा, लाठी – काठी, मर्दानी खेळ, कराटे प्रात्यक्षिक, वारकरी सांप्रदाय, ढोलपथक, गजी ढोल, ताशे – सनई

पारंपरिक वाद्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढून शिवजयंती साजरी करीत आहे. सामाजिक राखल्याबद्दल वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या उपस्थितीत वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या वतीने शिव छत्रपती ग्रुप संभाजी ब्रिगेड यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रशांत पवार, तालुकाध्यक्ष सचिन अनपट, जिल्हा संघटक रमेश चव्हाण, अमर फुके, बबन पवार, किरण घोरपडे, किरण साळुंके, सहकाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)