शिवचित्र नाणी व मुद्रांचे प्रदर्शनास प्रतिसाद

लोणी काळभोरमध्ये पहिलेच प्रदर्शन : अंबरनाथ प्रतिष्ठानचा उपक्रम

लोणी काळभोर-नित्यनवीन उपक्रम आयोजित करणाऱ्या अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक शिवचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये शिवकालीन चित्रे, शस्त्रे, नाणी, मुद्रा, मोडीपत्र तसेच गडकिल्ल्यांची माहिती नागरिकांना देण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी त्या नाण्यांची राजकीय व ऐतिहासिक माहितीदेखील सादर करण्यात आली. जुन्या अंबरनाथ भाजी मंडईशेजारी भरवण्यात आलेले हे पहिलेच प्रदर्शन आहे. यामधून शिवकालीन इतिहास अभ्यासण्याचा, जपण्याचा व इतर तरुणांनाही त्याचे महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तरुणांना इतिहासाजवळ नेऊन त्याबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते अशी माहिती आयोजकांनी दिली. या प्रदर्शनाला गुरुकुल सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे प्रमुख योगेश ओगले यांचे मार्गदर्शन लाभले. श्रेयस क्‍लासेसच्या विद्यार्थ्यांनी सर्व नागरिकांना याबाबतची माहिती दिली. याकामी संतोष सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यांत शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतरच्या काळातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील चलनात असलेली होण (सुवर्णमुद्रा), शिवराई (ताम्रमुद्रा) अशा प्रकारची दुर्मीळ व आकर्षक नाणी या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. हभप विनोद महाराज काळभोर यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून प्रदर्शनांचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, उपसरपंच सीमा काळभोर, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश भोसले, पूर्व हवेलीतील शिवसेना व युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, शिवप्रेमी, इतिहास प्रेमी, विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रदर्शन यशस्वीपणे पार पडण्यासाठी अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठानचे श्रेयस वलटे, साहिल पठाण, गिरीश घुसाळकर, अक्षय अडागळे, अक्षय ननवरे, तेजस घुसाळकर, प्रज्वल शिंदे, ऋषिकेश पवार आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)