शिवचरित्राच्या 1008 प्रतींचे वाटप

पिंपरी- शिवचरित्र सातासमुद्रपार उज्वल यशोगाथा म्हणून गौरविले जात आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांच्या विद्यापीठांमध्ये शिवछत्रपतींचे राज्यशासन अभ्यासले जात आहे. इतिहासातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या गौरवशाली चरित्रामुळे वाचन संस्कृती जागतिक पातळीवर प्रबळ बनत आहे, असे प्रतिपादन प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त विजय कॉलनी गंगानगर येथे आयोजित केलेल्या शिवचरित्र प्रती वाटप कार्यक्रमात केले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती संतोष चव्हाण, गणेश मुळीक, प्रमोद परब, अक्षय जाधव, शुभम वाघमारे, अजय लुगडे, राहुल खराडे, सुशांत गायकवाड, चंद्रकांत पाडेकर, रॉनी फाजंगे, सागर संदनशिव उपस्थित होते. यावेळी शहीद सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करून शहीद जवानांनकरिता मदतनिधी उभा करण्याचे कार्य गंगानगर पेठ क्रमांक 28 – विजय कॉलनीतील गणेश मित्र मंडळाचे सदस्य करीत आहेत. अश्‍याच पद्धतीने साईराज कॉलनी बिजलीनगर येथेसुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना धैर्य सामाजिक संस्थेचे ओंकार उत्तेकर व सामाजिक कार्यकर्ते उमाकांत सोनवणे यांच्या हस्ते छत्रपतींच्या शिवचरित्र प्रतींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन रुपम खर्चे, बाळासाहेब घोळवे, योगीराज फुलसागर, सौरभ येठे, चिन्मय चौधरी, राहुल भोसले, साहिल गिरी, ओंकार पाटील, श्रीयश खर्चे, श्‍याम देसले, धनंजय खर्चे, मधुर माने, मनोहर पाटील, निलेश चोपडे, सुधीर राणे, सिद्धांत सोनवणे, संदीप खर्चे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)