शिवकुमार यांच्यावर पुन्हा छापे

बंगळुरू – कर्नाटकातील मंत्री एस डी शिवकुमार यांच्यावर आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा छापे घातले. त्यांच्या एकूण दहा ठिकाणांवर आज छापे घालण्यात आल्याची माहिती आयकर सूत्रांकडून देण्यात आली. बंगळूर खेरीज चेन्नाई, अिीाण दिल्लीत ही कारवाई करण्यात आली. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे दुसरे नेते विजय मुलगुंद यांच्या ठिकाणांवरही आज छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

गुजरातमधील राज्यसभा निवडणूक काळात कॉंग्रेसचे आमदार कर्नाटकातील ज्या रिसॉर्ट मध्ये ठेवण्यात आले होते त्या रिसॉर्ट मध्ये, आमदारांच्या देखभालीची जबाबदार शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे राजकीय आकसाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोक कॉंग्रेसकडून या आधीच करण्यात आला आहे. त्यावेळी शिवकुमार यांच्या सुमारे 66 मालमत्तांवर छापे घालण्यात आले होते. त्यावेळी पंधरा कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली होती. तथापी आज दहा ठिकाणांवर घालण्यात आलेल्या छाप्यात नेमके काय हाती लागले याचा तपशील मात्र अजून मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)