शिळींब ग्रामस्थ त्रस्त, पीक कर्जासाठी अडचण

वडगाव मावळ – शिळींब गावचे तलाठी दिलीप राठोड हे कार्यालयात सतत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. तर खरीप हंगामातील पीक कर्जासाठी अडचणी येत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
पीक कर्ज घेण्यासाठी 8 अ, सातबारा, ई-करार नोंद करुन घेणे गरजेचे असते. तसेच, कर्जदार खातेदारांचे थकित कर्ज आहे. त्यांच्या जमिनीवर जप्ती करण्याचे पत्र सोसायटीच्या वतीने तलाठी कार्यालयात दिले असून, यावर कार्यवाही होत नाही. विविध कामे तलाठी कार्यालयात असतात. परंतु, तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड गैरसोय होत आहे. शिळींब सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे व सचिव रामदास पाठारे यांनी तहसिलदार व विभागीय आयुक्त यांच्याकडे याबाबत निवेदन देत तक्रार केली आहे.
सोसायटीने थकबाकी खातेदारांचे जप्ती आदेशाची नोंद करण्यासाठी कार्यालयात 30 जानेवारी 2017 व 28 फेब्रुवारी 2017 रोजी अर्ज केला होता. परंतु, अद्याप नोंद केली नाही. कॉलनी परिसरात 40 गावातील शेतकरी या मंडल कार्यालयात येतात. तलाठी उपलब्ध होत नसल्याने कार्यालयाचा अतिरिक्त कारभार मंडल अधिकाऱ्यांकडे आहे. परंतु, मंडल अधिकारी देखील आठवड्यातील एकच दिवस कार्यालयात उपलब्ध असतात. तलाठी कार्यालयाच्या या कारभाराला ग्रामस्थ वैतागले असून ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)