बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर डेब्यू करणार आहे. ती महाभारतातील द्रौपदीच्या भूमिकेसाठी आपला आवाज देणार आहे. याबाबत शिल्पा शेट्टीने सांगितले की, आमच्या बालपणी आम्हाला फक्‍त बीआर चोप्रा यांची “महाभारत’ ही मालिका पाहण्याची परवानगी होती. त्यामुळे मी कायम अध्यात्मावर विश्‍वास ठेवला आहे.

तसेच द्रौपदी हे पात्र खूपच सुंदर आणि प्रेरणादायी असून मला आनंद आहे की मी त्याला माझा आवाज देत आहे.
रेडिओवर एन्ट्री करण्याच्या तयारीत असलेली शिल्पा शेट्टी म्हणाली, हे काम चित्रपटापेक्षा खूपच वेगळे आहे. यात फक्‍त डबिंग असल्याने हा अनुभव माझयासाठी नवीन ठरणार आहे. यात मी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करणार आहे. आता मला वाटते की, माझया मुलांनी माझयाकडून पांडव आणि कौरवांच्या गोष्टी ऐकाव्यात.

दरम्यान, शिल्पा शेट्टीही खूपच अध्यात्मिक असून तिने आपल्या सहा वर्षाचा मुलगा वियानला महाकाव्य आणि पौराणिक कथांची माहिती देत आहे. तसेच शिल्पा स्वतः प्रवासाप्रसंगी कायम रेडिओ ऐकत असल्याचे तिने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)