शिल्पाने मुलाच्या वाढदिवसासाठी खास ‘लंडन’वरून मागविला केक

अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा नेहमीच व्हिडीओ आणि पुस्तकांच्या माध्यमातून फिटनेसबद्दल जनजागृती करताना दिसते. फिटनेसलाच महत्त्व देताना यावेळेस तिने मुलगा वियानचा वाढदिवस साजरा केला. शिल्पाने मुलाच्या वाढदिवसानिमित्त शुगर फ्री पार्टी दिली. शिल्पाचा मुलगा वियान गेल्या २१ मे रोजी सहा वर्षाचा झाला आहे. याच आनंदाच्या क्षणी शिल्पाने शुगर फ्री पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी शिल्पाने पार्टीत केक देखील नारळ, फ्रुट लॉलीज आणि याकुल्टसारख्या आरोग्यदायी पोष्टीक पदार्थांनी बनलेला मागविला होता. 

यावेळी शिल्पाने म्हटले की, यावर्षी मी माझ्या मुलाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करीत आहे की, पार्टीतील कुठल्याही खाद्य पदार्थात रिफाइंड शुगर नाही. त्यासाठी मी लंडन येथून लॉलीपॉप्स मागविले आहेत, जे शुद्ध फळांनी बनविलेले आहेत. तसेच त्यात रिफाइंड शुगरही नाही. डेजर्टसाठी आम्ही कोकोनट शुगर आणि मधाचा प्रयोग केला आहे. दरम्यान, शिल्पाने लंडन येथून मागविलेला केक पूजा ढींगराने बनविलेला आहे. पूजाने हा केक कोकोनट शुगरने बनविला आहे.वियानच्या वाढदिवसासाठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलाला घेऊन पार्टीत सहभागी झाले होते. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हीदेखील मुलगी आराध्यासोबत पार्टीत उपस्थित होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)