शिल्पाच्या लग्नाचा वाढदिवस मालदिवमध्ये साजरा 

शिल्पा शेट्टी सध्या पतीदेव राज कुंद्रासह मालदिवमध्ये लग्नाचा 9 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी रवाना झाली आहे. तिने सोशल मिडीयावर मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावरील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जर मला शक्‍य झाले तर इथेच कायमचे वास्तव्य करेन, असे शिल्पाने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. शिल्पाचे हे फोटो सोशल मिडीयावर खूप वेगात व्हायरल व्हायला लागले आहेत.

शिल्पाने स्वतःला मेन्टेन करण्यासाठी जीम एक्‍सरसाईजबरोबर योगाभ्यासही सातत्याने केला आहे. त्यासाठी तिला सेलिब्रिटी फिटनेस गुरु म्हटलेही जाते. तिने सोशल मिडीयावर आपले वर्कआऊटचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लुकचे रहस्य सगळ्यांना माहिती झाले आहे. लग्नाच्या वाढदिवसाला मालदिवला जाण्यापूर्वी शिल्पा, पती राज आणि मुलगा विवान हे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.

मालदिवच्या फोटोबरोबर शिल्पाने नवरा राज कुंद्रासाठी एक शुभेच्छा संदेशही पोस्ट केला आहे. प्रेम आणि सरप्राईज याबद्दल शिल्पाने राज कुंद्राचे आभार मानले आहेत. जन्मभर राजवर प्रेम करत राहण्याचे आणि कदाचित पुढच्या जन्मातही हे प्रेम असेच कायम ठेवण्याचे वचनही शिल्पाने आपल्या नवऱ्याला दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)