शिला पवार यांचे लोकसेवा आयोग परीक्षेत यश

पाचगणी ः शिला पवार यांच्या सत्कारप्रसंगी बाळासाहेब भिलारे व मान्यवर.

पाचगणी, दि. 27 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कासवंड गावाच्या सुनबाई शिला सागर पवार यानी महाराष्ट्रात 11 वा क्रमांक पटकावल्याने त्यांचे भिलार तसेच कासवंड गावातही जल्लोशी स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2016 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत 10331 विद्यार्थ्यानी अर्ज भरले होते. त्यामधील 3085 विद्यार्थ्यांनी शारीरिक चाचणी दिली तर मूलाखतीत 1795 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले यातून 750 उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली यामध्ये मुलींमध्ये सर्वसाधारण गटात सौ पवार ह्या महाराष्ट्रात 11 व्या आल्या. इचलकरंजी माहेर असल्याने त्यांनी येथील महाराष्ट्र अकॅडमीमध्ये शिक्षण घेतले होते.
सौ.पवार यांची पोलीस निरीक्षक म्हणून झालेल्या निवडीने त्यांच्या कासवंड या गावी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कासवंड गावात फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच गावची लेक पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे अप्रूप सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कासवंडचे नाव शिला पवार यांनी उज्वल केल्याने गावाने त्यांचा सत्कार केला.
पुस्तकांचे गाव भिलार येथेही काल शिला पवार यांचा ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, सभापती रुपाली राजपूरे, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, आनंदा भिलारे, गणपतशेठ पार्टे, आदी उपस्थित होते. पवार यांचे आमदार मकरंद आबा पाटील, रोटरीचे अध्यक्ष महेंद्र पांगारे, तिचे प्रशिक्षक बशीर शिकलगार, शबाना शिकलगार, चंद्रकांत पवार, संतोष दानवले,अजय राजपूरे, आनंद कांबळे, गुलाब गोळे, अनिल भिलारे व विविध क्षेत्रातील मान्यवरानि अभिनंदन केले आहे.
बाळासाहेब भिलारे यांनी यावेळी पवार यांच्या निवडीने कासवंडच्याच नव्हे तर महाबळेश्वर तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला असल्याचे सांगितले. यावेळी सागर पवार यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)