शिलाटणे ग्रामपंचायत सरपंचपदी भरत कोंडभर बिनविरोध

कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील शिलाटणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत सदाशिव कोंडभर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते सरपंच हेमंत शिवाजी भानुसघरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत भोकरे व ग्रामसेवक आनंता पोळ, तलाठी भाऊसाहेब जगताप यांनी सरपंचपदासाठी निवडणूक घेतली. निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी भरत सदाशिव कोंडभर यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे भरत कोंडभर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

माजी सरपंच हेमंत भानुसघरे, संगीता भानुसघरे, सुरेखा कोंडभर, उपसरपंच ज्ञानदेव भानुसघरे, सदस्या अलका येवले, निलम आहीरे यांनी कोंडभर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बाळासाहेब भानुसघरे, गणपतराव भानुसघरे, सेवादल अध्यक्ष तानाजी भानुसघरे, शिवसेना तालुका उपप्रमुख सुरेश गायकवाड, देवले उपसरपंच कृष्णा घिसरे, खांडशी माजी सरपंच धोंडिबा राणे, शिवाजी कोंडभर, नाथा कोंडभर, शिवाजी भानुसघरे, दत्ता कोंडभर, ज्ञानदेव मोरे, सुनिल गायकवाड, भरत येवले, संतोष कोंडभर, विनायक कोंडभर, रोहिदास कोंडभर, प्रवीण गायकवाड, अंकुश भानुसघरे, संतोष कोंडभर, अमोल भानुसघरे, संभाजी कुटे, शुभम गायकवाड शिवराजे ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)