शिर्सुफळला रेल्वे क्रॉसिंग उभारणार

खासदार सुळे : बारामती-दौंड लोहमार्गाचे विद्युर्तीकरण या महिन्या अखेर पूर्ण

बारामती- बारामती-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे या महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल व विजेवर चालणारी रेल्वे इंजिन वापरण्यास सुरुवात होईल. तसेच बारामती तालुक्‍यातील शिर्सुफळ येथे रेल्वे क्रॉसिंग उभारण्यात येणार आहे, त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च होणार असून यामुळे दोन रेल्वेगाड्या बारामती-दौंड या ट्रॅकवरून चालवता येणे शक्‍य होणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
बारामती दौंड विद्युतीकरणाचे काम खासदार सुळे यांच्या पाठपुराव्यातून सुरू आहे. याच कामाची पाहणी करण्यासाठे सुळे यांनी शुक्रवारी (दि. 22) बारामती रेल्वे स्थानकास भेट देऊन या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सध्या बारामती-दौंड या लोहमार्गावर एकच रेल्वेगाडी येऊ शकते मात्र, शिर्सुफळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे क्रॉसिंग उभारल्यास दोन्ही बाजूंकडून रेल्वे ये-जा करू शकतील त्यामुळे भविष्यात रेल्वे संख्या वाढवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. रेल्वेस्थानका शेजारी मालधक्का हलवण्याबाबत त्याच्या सुरू आहे तसेच रेल्वे स्थानकावरील फलाटावरील शेडची लांबी वाढविणे, प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी बाक उपलब्ध करून देणे ही कामे आगामी काळात करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. रेल्वे आरक्षणाची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत करावी अशी मागणी होती, त्याबाबतही संबंधितांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही सुळे यांनी दिली. यावेळी प्रवीण शिंदे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, नगरसेवक किरण गुजर, सविता जाधव, संभाजी होळकर, संदीप जगताप, आरती शेंडगे, वनिता बनकर, अनिता गायकवाड आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)