शिर्डी-सिंगापूर, औरंगाबाद-बॅंकॉकला थेट उड्डाण

आंतरराष्ट्रीय विमान सेवेचा होणार विस्तार

मुंबई: मुंबईच्या विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन आता राज्यभरातील विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार होणार आहे. त्यानुसार शिर्डीहून थेट सिंगापूर तसेच क्वालालंपूरला विमानोड्डाण केले जाणार आहे. त्याचबरोबर नागूपर-सिंगापूर, औरंगाबाद येथून बॅंकॉकला थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानसेवा केवळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरूनच सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार अन्य विमानतळांवरूनही करण्याबाबत सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.मुंबईप्रमाणेच नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचाही विकास केला जात आहे. शिर्डींमध्ये लवकरच रात्रीच्या वेळी विमानाचे लॅंडिंग करण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. शिर्डी-सिंगापूर/क्वालालंपूर, औरंगाबाद-बॅंकॉक/टोकियो, नागपूर-सिंगापूर या विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात येणार असून लवकरच ही प्रक्रिया मार्गी लवकरच मार्गी लावली जाणार आहे.

जळगाव-मुंबई, नाशिक-मुंबई, पुणे-मुंबई, कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा उडाण योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. मात्र यासाठी नेमण्यात आलेल्या एअर डेक्कन कंपनीकडून विमानसेवा योग्य पद्धतीने पुरविण्यात न आल्याने ही विमानसेवा अडचणीत आली. यावर पर्याय म्हणून एअर डेक्कनसोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. आता पुन्हा नव्याने निविदा काढून नवीन विमान कंपनीसोबत विमानसेवा पुरविण्याचा करार करण्यात येणार आहे.
जानेवारीपासून चिपी विमानसेवा सुरू सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला नागरी विमानोड्डाण महासंचालनालयाची परवानगी मिळाली आहे. याविषयी काही सूचना डीजीसीए’कडून करण्यात आल्या आहेत. त्या सूचनांनुसार विमानतळात योग्य ते बदल केले जाणार आहेत. जानेवारीच्या अखेरपर्यंत ही विमानसेवा सुरू होणार आहे. चिपीबरोबरच रत्नागिरी प्रवासी विमान सेवा जानेवारी महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याच्या नागरी विमानोड्डाण प्रधान सचिव वल्सा नायर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)