शिर्डी संस्थानाचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
नवी दिल्ली/शिर्डी: राज्यातीलच नव्हे तर जगातील श्रीमंत देवस्थानामध्ये ज्याची गणना होते, त्या शिर्डी साई संस्थानाचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे वर्षाला 400 कोटींचे उत्पन्न असणाऱ्या साई संस्थानाचा कारभार, 15 मार्च 2017 पासून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाती सोपवावा लागणार आहे.
अडीच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानाचा कार्यकारी अधिकारी आयएएस दर्जाचा असावा असा निर्णय दिला होता. मात्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्या निर्णयावर स्थगिती आणली होती. मात्र राजेंद्र गोंदकर आणि संदीप कुलकर्णी यांनी राज्य सरकराच्या भूमिकेविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णय कायम ठेवला आहे. वार्षिक 400 कोटी उत्पन्न असणाऱ्या साई संस्थानाकडे आज 1826 कोटी रुपयांच्या विविध बॅंकांत ठेवी असून, 371 किलो सोने, तर 4340 किलो चांदी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)